चिखली तालुक्यात पावसाचे थैमान! "क्रांतिकारी"चे पदाधिकारी अधिकाऱ्यांना घेऊन पोहोचले बांधावर; तातडीने पंचनामे करून नुसकान भरपाई देण्याची मागणी...
गेले काही वर्षापासून अतिवृष्टी, नापिकी यामुळे शेतकरी संकटात आहेत. यावर्षी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करून पेरणी करावी लागली. बँकेचे कर्ज घेऊन,दाग दागिने ठेवून पेरणीचा खर्च करावा लागला. सोयाबीन, कापूस, तुर, उडीद, मका या पिकांची लागवड चिखली तालुक्यात केलेली आहे. दरम्यान काल चिखली तालुक्यात पावसाने प्रचंड मोठे थैमान घातले. शेतजमिनी खरडून गेल्या, पिके वाहून गेली तर काही ठिकाणी शेतांचे तलाव तयार झाले आहेत. या पावसाने शेतकऱ्यांचे उभे पीक मोठ्या प्रमाणात पाण्यात बुडाल्याने खुप मोठ्या प्रमाणात नुसकान होऊन मोठी हानी झाली आहे. पावसाच्या या प्रकोपामुळे पांढरदेव, वरखेड, भोरसा भोरशी, सावंगी गवळी,नायगाव बु, मंगरूळ नवघरे, घानमोड मानमोड, अंबाशी, खैरव अशा अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे शाळेमध्ये पाणी शिरले, घरात पाणी शिरले, जनावरांच्या गोठ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांच्या घरातील अन्न धान्य, घरातील साहित्य - कपडे खराब झाले असून अनेक गावांमध्ये विजेच्या तारा तुटून मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच बाधित गावातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुसकान भरपाई द्यावी अशी मागणी केली.
यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रामेश्वर अंभोरे, हेमंत शेजोळ, गणेश शेजोळ, अशोक शेजोळ, नंदूभाऊ पांचाळ,विनोद हांडे,संतोष आकाळ, योगेश आकाळ, नागेश आकाळ , संदीप ढोरे ,तलाठी वराडे साहेब, कृषि सहाय्यक डुकरे पाटील मॅडम यासह शेतकरी उपस्थित होते.