अभिमानास्पद! मुलींना हलक्यात नका घेऊ; रणरागिणी आहोत आम्ही! भारत विद्यालयाचा अंडर –१७ मुलींचा क्रिकेट संघ पोहोचला राज्यस्तरावर...
Dec 21, 2024, 11:43 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नुकत्याच मेहकर येथे झालेल्या १७ वर्षाखालील मुलींच्या विभागस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत विद्यालय बुलढाणा च्या संघाने अजिंक्यपद प्राप्त केले .आता हा संघ राज्य स्तरावर अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. याद्वारे बुलढाणा शहराचे इतिहासात राज्य स्तरावर पोहोचण्याची कामगिरी करणारा पहिला मुलींचा क्रिकेट संघ होण्याचा मान भारत विद्यालयाने मिळविला आहे.
भारत विद्यालयाचां हा ३५ वा राज्य स्तरीय क्रिकेट संघ ठरला आहे "अजिंक्य, अभेद्य, अविरत" हे ब्रीदवाक्य असणाऱ्या भारत विद्यालय , बुलडाणा ने क्रिकेट विश्वावर असलेला दबदबा याही वर्षी कायम ठेवला आहे.
या वर्षी भारत विद्यालयाचा १९ वर्षाखालील मुलांचा व १७ वर्षाखालील मुलींचा असे दोन संघ राज्य स्तरावर पोहोचले आहेत. तसेच मुलांमधून विशाल जाधव व मिहिर माळी तर मुलीमधून प्रणिता उगले हे महाराष्ट्र संघ निवड चाचणी साठी पात्र ठरले आहेत. यावर्षी १७ वर्षाखालील मुलींचा लेदर बॉल क्रिकेट संघ देखील अमरावती येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत तो उपविजयी ठरला होता.
एकाच शाळेचे आतापर्यंत ३५ क्रिकेट संघ राज्य स्तरावर पोहोचण्याची विक्रमी कामगिरी भारत विद्यालयाने केली आहे. भारत विद्यालयाच्या अध्यक्षा डॉ सीमा आगाशे , सचिव अंगद आगाशे, प्राचार्य प्रल्हाद गायकवाड, उपप्राचार्य मोहन घोंघटे, पर्यवेक्षक नवल गवई, संघाचे प्रशिक्षक संजय देवल, सावरमल शर्मा, अरुण सौभागे ,संदेश पाटील, दिनेश गर्गे यांनी सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
हा आहे १७ वर्षाखालील मुलीचां क्रिकेट संघ..
प्रणिता उगले( कर्णधार , यष्टीरक्षक ), ऋतुजा पंडित (उपकर्णधार ), वैष्णवी हिंगे, प्रगती लोखंडे, वेदिका गवळी, मृणाल पडोळसे,प्रतीक्षा खरे, सुजाता हिवाळे,कृष्णाली देशपांडे, भाग्यश्री भामद्रे, सायली साखरे, सारा बानो, सानिका लहाने,रिद्धी कोकाटे, कोमल टेकाळे, श्रावणी घुबे,प्रशिक्षक संजय देवल, सावरमल शर्मा...