प्रगती ॲडव्हर्टायझिंगच्या नूतन वर्षाच्या आकर्षक कॅलेंडरचे चिखलीत विमोचन!
Jan 1, 2026, 12:34 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीच्या जाहिरात क्षेत्रात अल्पावधीत नावलौकिक कमावलेल्या "प्रगती ॲडव्हर्टायझिंग आणि फ्लेक्स प्रिंटिंग" च्या नूतन वर्षाच्या कॅलेंडरचा विमोचन सोहळा काल,३१ डिसेंबरला चिखलीत पार पडला. चिखली नगरीचे आराध्य दैवत आई रेणुका मातेच्या मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
मंगरूळ येथील कृष्णा पवार आणि चेतन शिंदे या दोघांनी मिळून जाहिरात क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. अतिशय कष्टातून मेहनतीने पुढे आलेल्या या तरुणांनी चिखलीत प्रगती ॲडव्हर्टायझिंग आणि फ्लेक्स प्रिंटिंग नावाने नवीन व्यवसाय सुरू केला. अगदी अल्पावधीत आपल्या सेवेने त्यांनी नावलौकिक कमावला. दर्जेदार डिझाईन, उत्कृष्ट छपाई आणि वेळेत पूर्ण होणारी कामे यामुळे त्यांच्यावरचा विश्वास वाढत आहे. दरम्यान व्यवसायाच्या नावानेच दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्याचाही निर्णय त्यांनी घेतला. अशा नव्या वर्षाच्या कॅलेंडरचे विमोचन भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णू घुबे, जाफ्राराबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन पाटील शिवणकर, भाजपचे जिल्हा सचिव कृष्णा सपकाळ, चिखलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कृष्णा मिसाळ, डॉ.विजय धायडे, विजय गवते, अक्षय सुरुशे, प्रसाद पाटील, विश्वासराव धुंदे, संदीप खरात, श्याम देशमुख, पवन सोनूने, अमोल शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.
