अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी बुलढाण्यात मतदानाचा वेग! पहिल्या दोन तासांत १५.४८ टक्के मतदान; १,४१२ शिक्षक मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क! पहा कोणत्या केंद्रावर किती मतदान...
बुलढाण्यात ९,१२४ मतदार; पुरुषांची संख्या सर्वाधिक
बुलढाणा जिल्ह्यात या निवडणुकीसाठी एकूण ९,१२४ मतदारांची नोंद आहे. यामध्ये ६,७१३ पुरुष, तर २,४११ महिला मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात मतदानासाठी एकूण १८ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांच्या आकडेवारीनुसार १,०५६ पुरुष आणि ३५६ महिला मतदारांनी मतदान केले. एकूण मतदानाची टक्केवारी १५.४८ इतकी नोंदविण्यात आली आहे.
कोणत्या केंद्रावर किती मतदान?
सकाळी १० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, मलकापूर मतदान केंद्रावर ६२३ पैकी ११६ मतदारांनी मतदान केले असून येथे १८.६२ टक्के मतदान झाले. बुलढाणा येथील एका केंद्रावर ६०० पैकी १०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी १८ टक्के आहे.
शेगाव येथे ६४० मतदारांपैकी ९७ जणांनी मतदान केले असून १५.१६ टक्के मतदान झाले. चिखलीतील दोन केंद्रांवर अनुक्रमे १५.३३ आणि १५.४२ टक्के मतदानाची नोंद झाली. खामगावमधील दोन केंद्रांवर अनुक्रमे १५.९५ आणि १९.६५ टक्के मतदान झाले आहे.दरम्यान, जळगाव जामोद येथे ११.४७ टक्के, मोताळा येथे १०.२६ टक्के, तर लोणार येथे १०.७८ टक्के मतदान झाले आहे.
दुपारी चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी आज सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यामुळे मतदानासाठी अद्याप बराच वेळ शिल्लक असून पुढील काही तासांत मतदानाचा वेग किती वाढतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यात १५.४८ टक्के मतदान झाले असून उर्वरित वेळेत किती शिक्षक मतदार मतदानासाठी बाहेर पडतात, यावर अंतिम मतदानाची टक्केवारी अवलंबून असेल. आता दुपारपर्यंत मतदानाचा टक्का किती वाढतो आणि जिल्ह्यातील शिक्षक मतदारांचा प्रतिसाद कसा राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.