एकनाथ शिंदेंच्या बुलढाणा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त! अप्पर पोलीस अधीक्षकांची बंदोबस्तावर नजर! ३२ अधिकारी अन् साडेतीनशे पोलिस तैनात...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याची उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आज बुलढाणा दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल ते मतदारांचे आभार मानणार आहेत, त्यामुळे या दौऱ्याचे नामकरण देखील आभार दौरा असे करण्यात आले आहे. टिळक नाट्य क्रीडा मंदिराच्या प्रांगणात ते मतदारांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा पोलीस दलाकडून चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी बंदोबस्त प्रभारी म्हणून काम पाहत आहेत.

 Buldhana

Advt 👆

अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांच्या नेतृत्वात २ उपविभागीय पोलीस अधिकारी, १० पोलिस निरीक्षक, २२ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक व २५० पोलिस कर्मचारी व दंगा काबूपथकाचे ३ पथक असे जवळपास साडेतीनशे पेक्षा जास्त पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साडेदहा वाजता राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेच्या मागील बाजूला असलेल्या हेलिपॅडवर आगमन होणार आहे.त्यानंतर ११ वाजता ते सभास्थळी पोहोचणार आहेत.