बुलढाणा जिल्ह्यात हुमणी अळीचा प्रकोप; ११६ गावांतील साेयाबीनचे पीक बाधीत ३१४ हेक्टवरील साेयाबीचे नुकसान! साेयाबीनसह मका आणि कपाशीवरही प्रादुर्भाव..!
चिखली तालुक्यातील काही गावांमध्ये सुरूवातीला साेयाबीन पिकावर हुमनी अळीचा प्रादुर्भाव आढळला हाेता. त्यानंतर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील पिकावर हुमनी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. माेताळा तालुक्यात तर साेयाबीनबराेबरच मका आणि कपाशी पिकावरही प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजात स्पष्ट करण्यात आले आहे. या अहवालानुसार चिखली तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या तालुक्यातील ४९ गावातील २२५ हेक्टरवरील पिकावर हुमनी अळीचा प्रादूर्भाव झाला आहे. मेरा बु व इतर परिसरातील शेतकऱ्यांनी तर साेयाबीन पिकावर राेटावेटर फिरवले आहे. बुलढाणा तालुक्यातील १७ गावातील २६ हेक्टर, माेताळा तालुक्यातील २१ गावातील ३२ हेक्टर, लाेणार तालुक्यातील १२ गावातील ८ आणि देउळगाव राजा तालुक्यातील १७ गावातील २३ हेक्टवरील पिके बाधीत झाले आहेत. शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच कीड नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज कृषी विभागावर मोठ्या प्रमाणावर आहे.