

ऑक्सीजन सिलेंडरचा स्फोट; एकाचा मृत्यू,दुसरा गंभीर जखमी! मलकापूर हादरले
Mar 23, 2025, 18:51 IST
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मलकापूर शहरातील लक्ष्मी नगर मध्ये शिवराज फायर सर्विसेस या एजन्सीत ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मलकापूर शहरातल्या हायवे लगत असलेल्या लक्ष्मी नगर मध्ये शिवराज फायर सर्विसेस या एजन्सीत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट होऊन एक जण जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. प्राथमिक माहितीनुसार तापमान वाढीमुळे किंवा जूने जंगलेले सिलेंडर असल्यामुळे सिलेंडरचा स्फोट झाला असावा अशी माहिती मिळाली आहे. सिलेंडरचा स्फोट झाला त्यावेळी घटनास्थळी जवळपास 100 ते 120 ऑक्सीजन सिलेंडर भरलेले होते. या दुर्घटनेत अनंत देशमुख या चाळीस वर्षीय इसमाचा मृत्यू झाला असून दुसरा त्याचा भाचा गंभीर जखमी झाला आहे. त्यावर मलकापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.