ज्या गाडीतून तहसीलदार अवैध रेतीवाहतूक रोखण्यासाठी जातात त्या गाड्याच रेतीमाफीयांच्या;

शिवसेनेच्या नेत्याचा सिंदखेडराजा तालुक्यात तहसीलदारांवर गंभीर आरोप! म्हणाले, अर्थपूर्ण देवाणघेवाण; कॉल रेकॉर्ड तपासा...
 
सिंदखेडराजा (बाळासाहेब भोसले: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खडकपूर्णा नदीवरील अवैध रेती उपसा आणि वाहतूक रोखण्याची जबाबदारी तहसीलदारांची आहे. मात्र तहसीलदार जबाबदारी पार पाडत नाहीत. त्यांचे रेतीमाफीयांसोबत अर्थपूर्ण संबंध आहेत. नाममात्र लोकांवर कारवाई करतात मात्र खऱ्याखुऱ्या अवैध रेतीमाफीयांना ते अभय देतात असा गंभीर आरोप शिवसेनेचे सिंदखेडराजा तालुका संघटक म्हसाजी वाघ यांनी केला आहे. तशी लेखी तक्रार त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिली आहे..
 ज्या गाडीतून तहसीलदार अवैध रेती वाहतूक आणि उपसा रोखण्यासाठी जातात त्या गाड्याच रेतीमाफीयांच्या असतात. असा गंभीर आरोप देखील वाघ यांनी केला आहे. त्यामुळे रेतीमाफीया कधीच तहसीलदारांच्या हाती लागत नाहीत. सिंदखेड राजा तहसीलदार जेव्हापासून रुजू झाले तेव्हापासून त्यांच्या दोन कोतवालांचे कॉल रेकॉर्ड तपासून पहा, दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. भ्रष्टाचार करून त्यांनी शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा वाघ यांनी दिला आहे...