आमदार संजय गायकवाड यांच्या "त्या" विधानावर भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले, एकनाथ शिंदेशी.....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशकाला शिवीगाळ प्रकरणात चांगलेच अडकले आहेत. "शिवाजी कोण होता"या पुस्तकाच्या लेखकाला आई बहिणी वरून शिवीगाळ करत आमदार गायकवाड यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती, ती कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड वादळ उठले. एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेने यावर सावध पवित्रा घेतला आहे.
 आमदार गायकवाड यांची बाजू घ्यायला शिवसेनेचा कोणताही प्रवक्ता तयार नाही. तिकडे कोल्हापुरात आमदार गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार गायकवाड वर गुन्हा दाखल व्हावा यासाठी महाराष्ट्रभरातील पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे,दुसरीकडे भाजपनेही यावर हात वर केल्याचे दिसत आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काल शेगाव येथे संघटनात्मक कामासाठी आले होते. कार्यक्रम आणि बैठकानंतर माध्यमांनी त्यांना संजय गायकवाड यांच्या शिवीगाळ प्रकरणावरून विचारणा केली.त्यावेळी फार काही न बोलता यावर एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून कारवाई होईल असे रविंद्र चव्हाण म्हणाले..