बुद्ध पौर्णिमेच्या रात्री ज्ञानगंगात प्राणी गणना! ११ बिबट दिसले अन् २५ अस्वल...आणखी काय काय दिसलं? वाचा....

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ज्ञानगंगा अभ्यारण्यात वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल ११ बिबट, २५अस्वल, १८० रानडुक्कर यासह इतर वन्यप्राणी आढळून आले आहेत. बुध्द पौर्णिमेच्या रात्री वन्यजीव विभागाने उभारलेल्या कृत्रीम व नैसर्गिक पानवठ्यावर आलेल्या वन्यप्राण्यांची गणना करण्याची मोहीम वनविभागाच्या माध्यमातून राबविल्या जाते. या उपक्रमाअंतर्गत प्राण्यांची गणना करण्यात येते.

खामगाव ज्ञानगंगा अभयारण्यात निसर्ग अनुभव व वन्यप्राणी गणनेसाठी तीस मचान उभारण्यात आले होते. वन्यप्राण्याचे दर्शन व्हावे यासाठी अनेक निसर्गप्रेमींनी वन्यजीव विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यामुळे कृत्रीम व नैसर्गिकरित्या तयार करण्यात आलेल्या पानवठ्यावर उभारलेल्या या मचानांवर बसून निसर्गप्रेमीना वन्य प्राण्यांना पाहता आले. वन्यविभागाने रात्रभर केलेल्या वन्यप्राणी गणनेत ११ बिबट, २५ अस्वल, १८० रानडूक्कर, ८ सायाळ, ३३ ससा, ६ तडस, १६ भेडकी, ६९ निलगाय, ११५ मोर लांडोर, २ चिंक्कारा, ९ हरीण, १ खवले माजर, १० रानमांजर, ४ मुंगूस, ३८ माकड असे प्राणी दिसून आले आहे.