८ सप्टेंबरला महाराष्ट्रात ठिकठिकाणी चक्काजाम! समृध्दी महामार्गावर बैलगाड्या घेऊन घुसणार; रविकांत तुपकरांची सिंदखेडराजातून गर्जना....

 
Tupkar

सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोयाबीन कापसाच्या भाववाढीसाठी तसेच प्रलंबित पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी म्हणून रविकांत तुपकर यांनी आजपासून सिंदखेडराजात बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. हजारो शेतकरी राष्ट्रमाता जिजाऊंच्या राजवाड्यासमोर जमले आहेत. दरम्यान रविकांत तुपकर यांनी या आंदोलनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांची देखील घोषणा केली आहे. रविकांत तुपकर यांचे सिंदखेडराजात अन्नत्याग आंदोलन सुरू असतानाच जिल्ह्यासह राज्यातही अनेक भागांत या आंदोलनाचे विविध टप्पे होणार आहेत. विशेष म्हणजे ८ सप्टेंबरला महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणाही रविकांत तुपकर यांनी केली आहे.

उद्या,५ सप्टेंबरला शेतकरी आपापल्या भागातील तहसीलदार व जिल्हापातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. ६ सप्टेंबरला गावागावात प्रभारतफेरी निघेल. ७ सप्टेंबरला गावागावात ग्रामसभा घेऊन तिथे शेतकऱ्यांच्या मागण्यांचे ठराव घ्यावे असे आवाहनही तुपकर यांनी केली. ८ सप्टेंबरला चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. समृध्दी महामार्ग देखील अडवू, समृध्दी महामार्गावर बैलगाड्या घेऊन घुसू असा खणखणीत इशाराही तुपकर यांनी दिला आहे.