ना. प्रतापराव जाधव यांनी केली बुलडाण्यातील कार्यक्रम स्थळाची पाहणी! १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पवार बुलडाण्यात

 
जाधव
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची लोकार्पण १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याची दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येत असून आज,१६ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. 
 बुलडाणा शहरात उभारण्यात आलेल्या महापुरुषांच्या २६ स्मारकांची लोकार्पण या दिवशी होणार आहे. शिवाय शहरातील शारदा ज्ञानपीठच्या मैदानावर लाडकी बहीण योजनेचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम देखील होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आ.संजय गायकवाड, आ.संजय रायमुलकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.