राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा बुलढाण्यात येणार! १९ जूनला घेणार महिला सुरक्षेचा आढावा..
Updated: Jun 16, 2026, 08:49 IST
बुलढाणा(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष विजया रहाटकर १९ जून रोजी बुलढाणा येथे येत आहेत. महिला सुरक्षा,महिला अत्याचाराची प्रकरणे, महिला व बालकल्याणाशी संबंधित योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा त्या घेणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्या दौऱ्याची अधिकृत तयारी सुरू केली असून विविध विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विजया रहाटकर १९ जूनला छत्रपती संभाजी नगर येथून बुलढाण्यात पोहोचतील. दुपारी १२ वाजता रामजी हॉल येथे भेट देऊन दुपारी २ वाजता जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी ४ वाजता त्या जिल्हा कारागृहाला भेट देणार आहेत. तिथे महिला कायद्यांच्या व्यवस्थेची पाहणी त्या करू शकतात. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने आवश्यक त्या विभागांना सूचना दिल्या आहेत.