MPSC : तीनदा टळली, आता चौथ्यांदा तरी होणार ना? उमेदवारांची धाकधूक कायम!! जिल्ह्यात 12 परीक्षा केंद्र सज्ज

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यातील आघाडी सरकारला अडचणीत आणणारी एमपीएससीची परीक्षा आजवरच्या काळात तीनदा टळली! आता ती उद्या, 21 मार्चला आयोजित केली असली तरी ती नक्की होणार ना, अशी धाकधूक हजारो परीक्षार्थींमध्ये कायम असल्याचे मजेदार चित्र आहे. दरम्यान या परीक्षेसाठी शहरातील 12 परीक्षा केंद्र तयार करण्यात आले असून कर्मचारी सज्ज झाले …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राज्यातील आघाडी सरकारला अडचणीत आणणारी एमपीएससीची परीक्षा आजवरच्या काळात तीनदा टळली! आता ती उद्या, 21 मार्चला आयोजित केली असली तरी ती नक्की होणार ना, अशी धाकधूक हजारो परीक्षार्थींमध्ये कायम असल्याचे मजेदार चित्र आहे. दरम्यान या परीक्षेसाठी शहरातील 12 परीक्षा केंद्र तयार करण्यात आले असून कर्मचारी सज्ज झाले आहेत.

यापूर्वी तीनदा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. मागील 14 मार्चला आयोजित परीक्षा ऐन वेळी पुढे ढकलण्यात आली. यामुळे बुलडाण्यात उमेदवारांनी निदर्शने केली होती. यामुळे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने 21 मार्च ही तारीख घोषित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आता 21/3 च्या मुहूर्तावर परीक्षा होऊ घातली आहे. जिल्ह्यातील 3912 उमेदवारांनी यासाठी नोंदणी केली आहे. बुलडाणा शहर परिसरातील 12 केंद्रांवरून परीक्षा पार पडणार आहे. यामध्ये शिवाजी, प्रबोधन, भारत, एडेड, हायस्कूल, सहकार विद्या मंदिर, गुरुकुल ज्ञानपीठ, शारदा कॉन्व्हेंट, लिंगाडे पोलिटेक्निक, शाहू व लद्धड अभियांत्रिकी , सेंट जोसेफ, राजीव गांधी मिलिटरी स्‍कूलचा समावेश आहे यासाठी केंद्र प्रमुख, केंद्र लिपिक, समवेक्षक, पर्यवेक्षक, समन्वय अधिकारी व शिपाई मिळून 300 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.