कोल्हापुरात आमदार गायकवाडांच्या पुतळ्याला जोड्याने मारले; बुलढाण्यात शिवसैनिकांनी केला दुग्धाभिषेक...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):" शिवाजी कोण होता" या गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशकाला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्यानंतर आमदार गायकवाड राज्यभरात टीकेचे धनी झाले आहेत. पुस्तकाच्या नावात एकेरी उल्लेख असल्याच्या कारणावरून आ.गायकवाडांनी पुस्तकाच्या प्रकाशकाला शिव्यांची लाखोली वाहिली होती. संबंधित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर वातावरण प्रचंड तापले. संपूर्ण महाराष्ट्रात पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते आ.गायकवाडांचा निषेध करत आहेत. विधीतज्ञ असीम सरोदे बुलढाण्यात "शिवाजी कोण होता" या पुस्तकाचे जाहीर वाचन करण्यासाठी येणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे रोहित पवार देखील २८ एप्रिलला बुलढाण्यात येणार आहेत. तिकडे कोल्हापुरात आमदार गायकवाड यांच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले.. दरम्यान राज्यभरात आमदार गायकवाड यांचा निषेध होत असताना, बुलढाण्यातील शिवसैनिक मात्र आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ एकवटले आहेत. आज बुलढाण्यात आमदार गायकवाड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. 

 शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या अनुजा सावळे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी बुलढाण्यात एकत्र येत आमदार गायकवाड यांच्या प्रतीकात्मक प्रतीकात्मक बुद्धाभिषेक केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देण्यात आल्या.
आमदार गायकवाड छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहेत.
महाराज महाराष्ट्राची अस्मिता आहेत, त्यांचा एकेरी उल्लेख कोण सहन करेल? असा सवाल अनुजा सावळे यांनी करीत आ.गायकवाडांचे समर्थन केले. आमदार गायकवाड यांनी प्रकाशकाच्या कुटुंबीयाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.. वाद पुस्तकाच्या नावावरून आहे, त्यावरचा आक्षेप कायम असल्याचे अनुजा सावळे म्हणाल्या...