मेहकर येथे ११ मे मोफत किडनी प्रत्यारोपन शिबिर! भूमिपुत्र वैद्यकीय कक्षाचे आयोजन! केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव करणार उद्घाटन! नामवंत डॉक्टर करणार उपचार...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनातून साकार करण्यात आलेल्या भूमिपुत्र वैद्यकीय कक्षाचा सामान्यांना चांगलाच फायदा होत आहे. ११ मे रोजी भूमिपुत्र वैद्यकीय पक्षाच्या वतीने मेहकर येथे मोफत किडनी प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ना.जाधव यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार आहे.

    भूमिपुत्र वैद्यकीय पक्षाच्या वतीने रुग्णांना वैद्यकीय मदत केल्या जात आहे. आतापर्यंत भूमिपुत्र वैद्यकीय पक्षाच्या वतीने मोफत वैद्यकीय शिबिर, नेत्र तपासणी आणि मोफत चष्मा आयोजन करण्यात आले आहे. गरजूंना वैद्यकीय सेवा आणि आरोग्य विषयक मार्गदर्शनही भूमिपुत्र कक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना महानगरातील एम्स रुग्णालयात देखील वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहे. आता ११ मे रोजी मोफत किडनी प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मेहकर येथील राजश्री आयुर्वेदिक महाविद्यालयात सकाळी ११ वाजता या शिबिराला सुरुवात होणार असून उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.
 किरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भागवत भुसारी यांची देखील यावेळेला उपस्थिती राहणार आहे.