मेरा खुर्द येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न!

 
 मेरा खुर्द (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कोणतेही बॅनर लावू नका, पोस्टर्स लावू नका अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या.दरम्यान मेरा खुर्द येथे साखरखेडा मंडळ भाजपच्या वतीने २२ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी अनेकांनी या रक्तदानाच्या महायज्ञात सहभाग घेतला..

 
  बुलढाणा येथील लीलावती ब्लड बँकेने यासाठी सहकार्य केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. माजी जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांडे, भाजप नेते सुनील कायंदे, प्रदेश कार्यकारणी सदस्य उल्हास देशपांडे, विष्णू घुबे, रंगनाथ वरपे, अंचरवाडी येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर परिहार, विठ्ठल कथे, पप्पू भुतेकर यांनी शिबिराला भेट दिली. यावेळी साखरखेर्डा मंडळ भाजपचे अध्यक्ष शिवाजी वाघ, बाळुभाऊ खेडेकर, सुभाष बोर्डे, एकनाथराव थुट्टे, गणेश गव्हले, जनार्धन थुट्टे, बालाजी थुट्टे, कृष्णा सपकाळ,पवन अंभोरे पाटील, विठ्ठल मिसाळ, मयूर वाघमारे,गणेश जावळे, रामेश्वर झाल्टे , योगेश गवते, विठोबा तावरे, अनंता काशीकर,आकाश परिहार आदींनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.