अंचरवाडी येथे २३ जूनला महाआरोग्य शिबिर; आमदार मनोजभाऊ कायंदे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल कार्यक्रम.....! मोफत औषधांचे वाटपही होणार..

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार मनोज कायंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंचरवाडी येथे रविवार, दि. २३ जून रोजी भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मनोज कायंदे
Advt 👆
या शिबिरात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येणार असून, रुग्णांना मोफत औषधांचाही पुरवठा आयोजकांच्या वतीने केला जाणार आहे.
हे तज्ञ डॉक्टर देणार रुग्णसेवा...
डॉ. विशाल सावळे (एम.डी. मेडिसिन),डॉ. पवन राऊत (हाडांचे तज्ज्ञ),डॉ. आखाडे (बालरोग तज्ज्ञ),डॉ. बंगाळे (नेत्ररोग तज्ज्ञ),डॉ. योगिता महाडिक (दंतरोग तज्ज्ञ),डॉ. अतुल पवार (स्त्रीरोग तज्ज्ञ)...
हा उपक्रम परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, आरोग्याबाबत जनजागृतीसह मोफत सेवा मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.या उपक्रमाचे आयोजन संतोष परिहार, संतोष आटोळे, शेख आसिफ भाई, तालुका युवा अध्यक्ष रुपेश रिंढे व आनंदा वायसे यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.