बुलढाणा शहरात प्रभू विश्वकर्मा जयंती व मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न....

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संपूर्ण देशभरात प्रभू विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. बुलढाणा शहरात देखील प्रभू विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रभू विश्वकर्मा यांच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देखील येळगाव गावाजवळ असलेल्या एमआयडीसी जवळ संपन्न झाला...

  ३ दिवस नामसंकीर्तनाने हा सोहळा साजरा झाला. जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव या सोहळ्यासाठी उपस्थित होते. विशेष म्हणजे अल्पावधीत या मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात आल्याची माहिती बुलढाणा सुतार समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय खोलाडे यांनी दिली. यावेळी कामगार नेते सतीश शिंदे, विश्वकर्मा पतसंस्थेचे अध्यक्ष समाधान सुरोशे, गजानन बोराडे, सचिन राजगुरे, योगेश राजगुरे आधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..