लोणार रुग्णालयातील "त्या" घटनेप्रकरणी दोषींना सोडणार नाही; माजी आ. संजय रायमुलकरांना आरोग्यमंत्र्यांनी दिला शब्द....

 
 लोणार(प्रेम सिंगी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार ग्रामीण रूग्णालयातील घटनेबाबत दोषींवर कडक कारवाई करा, अशी मागणी माजी आ.डॉ. संजय रायमूलकर यांनी केली आहे.
पैठण येथील हरिभाऊ बापूजी लोकडे (वय ६५) यांचा २३ डिसेंबर रोजी सकाळी ३.३० मिनिटाच्या दरम्यान रूग्णालयाला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, २४ डिसेंबर रोजी माजी आमदार डॉ. संजय रायमूलकर, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. बळीराम मापारी, शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, युवा सेना तालुका प्रमुख गजानन मापारी, उपतालुका प्रमुख समाधान साबळे, माजी नगरसेवक डॉ. अनिल मापारी, गुलाबराव सरदार, रंगनाथ मोरे, शैलेश सरकटे, देवानंद चौधरी यांनी भेट दिली. यावेळी बोलताना डॉ. संजय रायमूलकर म्हणाले की, ही अतिषय संतापाची घटना आहे. एक जिवंत माणसाचा ग्रामीण रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे आगीत होरपळून मृत्यू होतो व हे नंतर लक्षात येते, या मधील दोषी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आबेटकर यांना रुग्णालयातून
फोन करून या घटनेची संपूर्ण माहिती दिली व एक समिती नेमून यामध्ये जो दोषी असेल, त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे सांगितले व दोषी आढळल्यास सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा बळीराम मापारी यांनी यावेळी सांगितले की, एव्हडी मोठी घटना या रुग्णलयात घडते व एका निष्पाप रुग्णाचा जीव जातो, या वरून हे अधिकारीख कर्मचारी किती निष्काळजी आहेत हे सिद्ध होते. यावेळी शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, युवासेना तालुका प्रमुख गजानन मापारी, माजी नवरसेवक डॉ. अनिल मापारी, गुलाबराव सरदार, रंगनाथ मोरे, माजी शहर प्रमुख अशोक वारे, राहुल मापारी, देवानंद चौधरी, पंढरी डोईफोडे, शेलेश सरकटे, शेख रफिक, शुभम भगत, दीपक खरात, मदन काकडे आदी उपस्थित होते.
यावेळी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन आरोग्य मंत्री प्रकाश आबेटकर यांनी माजीआमदार डॉ. संजय रायमूलकर यांना दिले...