ऐका हो ऐका..! मेहकर तालुक्यातील "या" ५७ गावांमध्ये पोलिस पाटलांची भरती! पहा जमते का...

 
 
मेहकर(प्रसाद देशमुख:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पोलीस पाटील हा गावची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीचा महत्त्वाचा दुवा. पोलीस स्टेशन आणि गाव या पातळीवर काम करून पोलिस पाटील महत्वाचे काम बजावतात. पोलीस पाटलांची नियुक्ती महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, १९६३ च्या तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्याद्वारे केली जाते. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून मेहकर तालुक्यातील ५७ गावांमधील पोलीस पाटील पदाची पदे भरल्या गेली नव्हती..मात्र आता लवकरच ती पदे भरली जाणार आहेत...
   मेहकर चे उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांनी यासंदर्भात नुकतीच आढावा बैठक घेतली आहे. मेहकर तालुक्यातील मोहना बुद्रुक, मांडवा फॉरेस्ट, पारखेड, घाटनांद्रा ,दृगबोरी ,गोमेधर, घुटी ,बोथा ,निंबा, भिवापूर, रत्नापूर, वरूड, विशवी ,जनुना,कनका, पांगरखेड, उमरा देशमुख, कराळवाडी , मादणी, आरेगाव, हिवरा साबळे, मोळा, नागापूर,अंत्री देशमुख, चायगाव, कळप विहीर, चोंडी, पारडा, बरटाळा, फैजलापुर ,सारंगपूर, पिंपळगाव उंडा, हिवरखेड ,लोणी, शेलगाव काकडे, सावंगी माळी, रायपूर, कोयाळी, उसरण, वरदडी (वैराळ), शेंदला, खुदनापूर, सोनार गव्हाण, नानज, गौंढाळा, पिंपरी माळी, खंडाळा, खानापूर ,जामगाव, खामखेड, कल्याणा, उकळी, सुकळी, बोरी, बाभूळखेड ,कंबरखेड या गावांमध्ये लवकरच पोलीस पाटलांची भरती होणार आहे..