खामगांव अर्बन बँकेचा लोकोपयोगी उपक्रम! बुलडाणा शाखेत दिनदर्शिकेचे विमोचन; ७५ हजार घरांत मोफत पोहोचणार दिनदर्शिका....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): समाजसेवेत अग्रेसर असणाऱ्या खामगाव अर्बन बँकेने ग्राहक आणि सभासदांचा विश्वास कायम जपला आहे. त्यामुळेच आर्थिक क्षेत्रात बँकेने नावलौकिक मिळवला आहे. विविध लोकोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या खामगाव अर्बन बँकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत दिनदर्शिकेचा उपक्रम राबवला आहे. आज,३० डिसेंबरला २०२५ च्या दिनदर्शिकेचे विमोचन खामगाव अर्बन बँकेच्या बुलडाणा शाखेत सभासद व ग्राहकांच्या हस्ते करण्यात आले. बुलडाणा शाखेच्या पालक संचालिका सौ.विजयाताई राठी, आदिती अर्बनचे अध्यक्ष नंदकिशोर जी पाटील, शासकीय कंत्राटदार ओम बाहेकर, सारंग व्यवहारे यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती..

कार्यक्रमाच्या प्रारंभी बुलडाणा शाखेचे शाखाधिकारी श्री.देशपांडे यांनी बँकेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. गत १२ वर्षांपासून दिनदर्शिकाचा उपक्रम सुरू असल्याचे सांगत २०२५ ची दिनदर्शिका सभासद, ग्राहक, ठेवीदार, खातेदार, शासकीय निमशासकीय कार्यालयांसह ७५ हजार घरात मोफत पोहोचणार असल्याचे ते म्हणाले. ग्राहकांच्या विश्वासाच्या पाठबळावरच बँकेची वाटचाल सुरू असल्याचेही ते म्हणाले.