गॅस तुटवड्यामुळे पुन्हा सुरू होणार घासलेट (केरोसिन) वितरण! महाराष्ट्र शासनाचा निर्णय... प्रती कुटुंबाला मिळणार तीन लिटर!

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशभरातील गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राज्यातील नागरिकांसाठी तात्पुरते केरोसीन (घासलेट) वितरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला प्रतिक कुटुंबातील लिटर केरोसीन वितरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मार्च  अखेरीस जिल्ह्याला घासलेटचा साठा उपलब्ध होणारा असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. गावागावातील स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ परवानाधारक दुकानदारांना जिल्हास्तरावरून याचे वितरण होणार आहे. 
सपकाळ

 Advt 

महाराष्ट्र शासनाला ३७ लाख ४४ हजार लिटर केरोसीन केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आले आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये जिल्हानिहाय व कंपनी निहाय वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे.  ग्रामस्थ व शिधापत्रिकाधारकांना केरोसीनचे प्राधान्यांने वाटप होईल. मात्र ज्यांच्याकडे शिधापत्रिका नसतील अशांना सुद्धा उपलब्धतेनुसार केरोसिन मिळणार आहे. केरोसिन वितरण हे तात्पुरते असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास यात सुधारणा केली जाऊ शकते.

भेसळ नको,अन्यथा कारवाई...

घासलेटचा वापर केवळ घरगुती उपयोगासाठी करता येणार आहे. पेट्रोल किंवा डिझेलमध्ये याची भेसळ आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.