श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेनिमित्त कबड्डीचे दणदणीत सामने; काेलारा येथे रंगणार सामने; पहिले बक्षीस ३१ हजार रुपये...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेनिमित्त काेलारा येथे कबड्डीचे दणदणीत सामन्यांचे आयाेजन २ नाेव्हेंबर राेजी सायंकाळी ६.३० वाजता करण्यात आले आहे. या स्पर्धेत परिसरासह जिल्हाभरातील कबड्डी संघाने सहभागी व्हावीे, असे आवाहन आयाेजकांनी केले आहे. 
काेलारा येथे २ नाेव्हेंबर राेजी श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेनिमित्त एका रात्रीचे कबड्डी सामने आयाेजित करण्यात आले आहेत. या स्पर्धेत प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये असून द्वितीय बक्षीस २१ हजार, तृतीय बक्षीस १५ हजार, चतुर्थ बक्षीस ११ हजार, पाचवे बक्षीस पाच हजार आणि सहावे बक्षीस फाेटाेफ्रेम अशी बक्षीसांची लयलुट हाेणार आहे.
२१०० रुपये प्रत्येकी प्राेत्साहनपर बक्षीसही देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी हाेणाऱ्या संघात ५७ किलाे वजनाचे पाच खेळाडू तर ६० किलाे वजनाचे दाेन खेळाडू खेळवता येणार आहेत. सायंकाळी हिरकणी महिला बॅंकेच्या अध्यक्षा अॅड वृषाली बाेंद्रे, अनुभुती अर्बन मल्टीपल निधी लि.चे अध्यक्ष शालीकराम चवरे गुरूजी, पीरीपाचे जिल्हाध्यक्ष विजय गवई, कृष्णा डेहरवाल, इजि. दिनेश साेळंकी, पूजा सचिन बडगे, संजय चंचरे, वनिताताई साेळंकी, सुनील साेळंकी, किसनराव साेळंकी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सामन्यांचे उद्घाटन हाेणार आहे.
या स्पर्धेत सहभागी परिसरातील व जिल्ह्यातील संघानी सहभागी व्हावे असे आवाहन अक्षय राणा, ओम भारती, उमेश आर्मी, कुणाल साेळंकी यांच्यासह ग्रामस्थांनी केले आहे.