बुलडाण्यात सोमवारी जन आक्रोश मोर्चा! आज स्नेहलताई, उद्या कुणाचा नंबर? बुडाणेकरांचा आर्त सवाल! धर्मवीर युथ फाऊंडेशन चा पुढाकार...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): त्रिशरण चौकात बोलेरो पिकअपच्या चालकाने वाहन निष्काळजीपणे चालविल्याने स्नेहल चौधरीचा धडक लागून बळी गेला. स्नेहलला न्याय मिळवून देण्यासाठी - धर्मवीर युथ फाऊंडेशनसह जागरूक बुलढाणेकरांच्या वतीने १० मार्च रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
 
 निर्दोष रस्त्यावर मरतात आणि गुन्हेगार मोकाट फिरतात, हे अन्यायाचे राज्य आहे का? असा सवाल बुलढाणेकर करत आहेत. कायदा कोणासाठी, आमच्यासाठी की गुन्हेगारीकरिता?, आज स्नेहलताई उद्या कोण? कायदा जर कठोर नसेल तर निर्भयपणे रस्त्यावर फिरायचे कसे? असा सवाल सर्वसामान्य बुलढाणेकर करीत आहेत. १० फेब्रुवारी २०२५ रोजी स्नेहल संदीप चौधरी या युवतीला बोलेरो पिकअपची धडक लागली. चालकाने दारूच्या नशेत वाहन चालवून तिचा बळी घेतला. तिच्या निधनानंतर न्याय मिळवून देण्यासाठी १० मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता जिजामाता प्रेक्षागार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात शहरातील समस्त माता, भगिनींसोबतच सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.