जय श्रीराम..! राजर्षी शाहू कोल्ड स्टोअरेजमध्ये श्रीराम मूर्तीचे पूजन ; शिवसेना जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके यांची संकल्पना
Apr 9, 2025, 07:44 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रामनवमीनिमित्त तालुक्यातील वरवंड येथील राजर्षी शाहू कोल्ड स्टोअरेजमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा शिवसेना (उबाठा) जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम घेण्यात आला.
जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी झाली. ठिकठिकाणी शोभायात्रा, मिरवणूक काढण्यात आल्या. डीजे, बँडच्या तालावर तरुणाईसह श्रीरामभक्तांची पाऊले थिरकली. वरवंड येथील राजर्षी शाहू कोल्ड स्टोअरेजमध्ये प्रभू श्रीरामांना वंदन करण्यात आले. यावेळी डोंगरखंडाळा, वरवंड, डोंगरशेवली ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते मूर्तीचे पूजन करण्यात आले. उपस्थित मंडळींनी पुष्प अर्पण करुन मूर्तीचे दर्शन घेतले.