"जय ज्योती, जय क्रांती!" घोषणांनी बुलडाणा दणाणला; समता भूमी पुणेहून मशाल यात्रा शहरात दाखल

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त समता भूमी पुणे येथून सुरू झालेली *मशाल यात्रा* आज बुलडाणा शहरात मोठ्या उत्साहात दाखल झाली. "जय ज्योती, जय क्रांती!" या घोषणांनी संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
धाड नाका येथे यात्रेचे स्वागत करत तिची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. बुलडाणा शहरातील विविध ठिकाणी ही यात्रा थांबवून नागरिकांनी, संघटनांनी आणि समाजबांधवांनी हार्दिक स्वागत केले.  
या यात्रेच्या माध्यमातून समतेचा, बंधुत्वाचा आणि सामाजिक जागृतीचा संदेश देण्यात आला. *क्रांतीसुर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती बुलडाणा* यांच्या वतीने यात्रेचे विशेष स्वागत करण्यात आले. शहरातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते व सामाजिक संघटनांनी यात सक्रिय सहभाग घेतला.