जमलं बॉ...आता पुढचे पाच दिवस जिल्ह्यातील हवामान कोरडे! हवामान विभागाने दिलाय अंदाज..

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी अवकाळी पाऊस देखील झाला..वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटामुळे सारेच परेशान होते.. जिल्ह्यात अवकाळी मध्ये दीड हजार पेक्षा जास्त हेक्टरवरील पिकांची नुकसान झाले आहे..दरम्यान या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आज,४ एप्रिलला वर्तवलेला अंदाज दिलासादायक ठरला आहे..पुढील ५ दिवस जिल्ह्यात हवामान कोरडे राहणार आहे.
  भारतीय हवामान विभागाच्या नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने प्रसिद्ध दिलेल्या हवामान अंदाजानुसार ४ ते ८ एप्रिल दरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र कमाल तापमानामध्ये २ ते ४ अंश सेल्सियसची वाढ होण्याची शक्यता असल्याने उकाडा सहन करावा लागणार आहे..
शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला...
उन्हाळ्यात भूजल पातळी खालावते, म्हणून शेतकऱ्यांनी पिकांना, फळबागांना ओलीत करतेवेळी पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी. कापणी/मळणी केलेल्या धान्याला उन्हात वाळवून घ्यावे जेणेकरून ते दिर्घकाळ साठवणीयोग्य राहील आणि त्यावर किडींचा प्रादुर्भाव होणार नाही. जनावरांना संभाव्य वाढत्या तापमानाचा त्रास होऊ नये म्हणून पिण्यासाठी थंड, स्वच्छ पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावे असा सल्ला 
जिल्हा कृषी हवामान केंद्र व 
कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा यांनी दिला आहे..