शाळेतच काळाने गाठले! सहकार विद्यामंदिरातील ८ वर्षीय विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू; सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू...
Jul 5, 2025, 15:39 IST
धाड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): येथून जवळच असलेल्या करडी येथील सहकार विद्या मंदिरात दुसऱ्या वर्गात शिकत असलेल्या आठ वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झाला. ही ह्दयद्रावक घटना ४ जुलै राेजी दुपारी घडली. राजवीर मनीषराव देशमुख (वय ८, रा. तराडखेड) असे मृतक बालकाचे नाव आहे.
.करडी येथील सहकार विद्या मंदिरात दुसऱ्या वर्गात शिकत असलेल्या राजवीर देशमुख हा शुक्रवारी दुपारी शाळेच्या आवारात खेळत हाेता. अचानक ताे खाली काेसळल्याने शिक्षकांनी त्याला धाड येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल केले. तेथून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डाॅक्टरांनी त्याला तपासून मृत घाेषित केले.
अचानक राजीवरचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त हाेत आहे. धाडचे ठाणेदार आशीष चचेरे यांनी शाळेत भेट देवून माहिती घेतली. बालकाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट हाेवू शकले नाही. या प्रकरणी बुलढाणा शहर पाेलिसांनी अकस्मिक मृत्यूंची नाेंद केली आहे.