"व्हॅलेंटाईन डे" च्या नावाखाली गुलू गुलू करणाऱ्यांना मिळणार चोप! कॅफे , गार्डन, मंदिर परिसरावर राहणार विशेष नजर....

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आहे.. प्रियकर प्रेयसीकडून हा डे साजरा करण्याचे वेगवेगळे प्लॅन ट्रेंडिंगला आहेत..मात्र प्रेमाच्या नावाखाली नको ते करू पाहणाऱ्यांवर शिवसेनेची नजर राहणार आहे..प्रसंगी अशा भामट्यांना चोप देऊ अशी भूमिका शिवसेनेचे नेते कपिल खेडेकर यांनी घेतली आहे..
 व्हॅलेंटाईन सप्ताहात जिल्ह्यातून बेपत्ता होणाऱ्या मुलींचा आकडा २० पर्यंत गेला आहे. हा आकडा चिंताजनक आहे. समाजाला या विषयावर चिंतन करावे लागणार आहे असे कपिल खेडेकर म्हणाले. व्हॅलेंटाईन डे च्या नावाखाली काही भामटे मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात..प्रेमाच्या नावाखाली त्यांच्यासोबत नको ते करतात. काही टवाळखोर मुलींना व्हॅलेंटाईन डे ला त्रास देतात. त्यामुळे कॅफे, गार्डन वर शिवसैनिकांची नजर राहील . टवाळखोरांना चोप देऊ असे कपिल खेडेकर म्हणाले.