संकटात ना. प्रतापराव जाधव गेले धावून! श्रीनगर मध्ये जाऊन घेतली जिल्ह्यातील पर्यटकांची भेट! परतीच्या प्रवासाची केली व्यवस्था....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २२ एप्रिलला जम्मू-काश्मीरच्या पहेलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर जम्मू कश्मीर मध्ये गेलेले सर्वच पर्यटक आपापल्या राज्यात परत येण्यासाठी धडपडत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील ४९ पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. दरम्यान आज,२४ एप्रिलला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी श्रीनगर मध्ये जाऊन बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटकांची भेट घेतली.. त्यांची आस्थेने विचारपूस चौकशी करून त्यांच्या परतीच्या प्रवासाची सोय केली.
 केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव तातडीने श्रीनगर मध्ये दाखल झाले आहेत. आरोग्य राज्यमंत्री या नात्याने त्यांनी जखमी झालेल्या पर्यटकांच्या उपचाराची देखील चौकशी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. याशिवाय बुलढाणा जिल्ह्याचे लोकसभा सदस्य या नात्याने जिल्ह्यातील पर्यटकांची भेट घेत त्यांना धीर दिला. यंत्रणेमार्फत पर्यटकांच्या परतीच्या प्रवासाची सोय देखील ना .प्रतापराव जाधव यांनी करून दिली आहे. संकट समई ना .प्रतापराव धावून आल्यामुळे पर्यटकांनी समाधान व्यक्त केले..