महत्वाची बातमी! बुलडाणा जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणी यादी प्रसिध्द;उमेदवारांनी आपल्या गुणांबाबत हरकती आक्षेप नोंदवण्याचे आवाहन....

 
Police

बुलढाणा(जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जिल्ह्यात दि. २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत होमगार्ड सदस्य नोंदणी घेण्यात आली. या नोंदणी दरम्यान पात्र उमेदवारांच्या तांत्रिक अर्हता मैदानी चाचणीत घेतलेल्या गुणांची उमेदवारांची यादी होमगार्ड संघटनेच्या खालील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

https://Maharashtracdhd.gov.in/mahahg/enrollmentadd.php 

जाहीर केलेल्या यादीतील उमेदवारांच्या नावासमोर तांत्रिक आणि मैदानी गुण दर्शविण्यात आलेले आहेत. उमेदवारांना आपल्या गुणांबाबत हरकती, आक्षेप असल्यास कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात स्वतःच्या नांव नोंदणी अर्ज क्रमांक चेस नंबर मोबाईल क्रमांक सह दि. १५ ते १६ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा होमगार्ड कार्यालय, बुलढाणा येथे स्वतः हजर राहून किंवा कार्यालयाच्या dchg buldhana@yahoo.com या ईमेल आयडीवर नोंद करावी. सदरच्या दोन्ही दिवशी जिल्हा होमगार्ड कार्यालय सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालू राहणार आहे. दिनांक १६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेनंतर प्राप्त होणाऱ्या हरकत व आक्षेपांची नोंद घेतली जाणार नाही, असे जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी कळविले आहे.