मोटार चालू केली पण पाणीच येत नव्हते...! धरणावर गेल्यावर दिसलं भलतचं....! चिखली तालुक्यातील नायगाव ची घटना...
Jan 14, 2025, 14:07 IST
नायगाव येथील शेतकरी दिनकर वामन गायकवाड (६५) यांनी या प्रकरणाची तक्रार दिली आहे. दिनकर गायकवाड गावाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते, त्यांनी मोटार सुरू केली. मात्र पाणीच येत नव्हते त्यामुळे पाणी का येत नाही हे पाहण्यासाठी ते धरणावर गेले. त्यावेळी त्यांना त्यांची सीआरआय कंपनीची ७.५ एचपीची मोटार दिसली नाही. तिथे वायर नटबोल्ट तुटलेले दिसले. त्याचवेळी धरणावरील अतुल देशमुख विजय लहाने परमेश्वर लहाने या शेतकऱ्यांच्या मोटार देखील लंपास झालेल्या दिसल्या.४ शेतकऱ्यांचे मोटार पंप चोरीला गेली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.