अण्णाभाऊंना भारतरत्न देण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते मुंबईला धडकणार! भाई छोटू कांबळे म्हणाले, घरचा ठेचा - भाकर बांधून मुंबई गाठणार

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना साहित्यक्षेत्रातील सर्वोत्कृष्ट सन्मान देण्यासाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भारतरत्न भव्य एल्गार महासभा मुंबई येथे दि. 27 सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. त्या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यातील तालुके शहरासह आसपासच्या गावागावात , वस्तीत ठिकठिकाणी या भारतरत्न एल्गार महासभेचे पोस्टर लावण्यात आले. तसेच या भारतरत्न एल्गार महासभा बाबत जनजागृती, मार्गदर्शन व चर्चासत्र संपन्न झाले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा. ही सन्मानाची लढाई असून त्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातून मोठ्या संख्येन कार्यकर्ते मुंबईला रवाना होतील. घरच्या ठेचा-भाकरी बांधून भारतरत्न एल्गार सभा यशस्वी करु अशी ग्वाही डेमोक्रेटिक पक्षाचे विदर्भ नेते भाई छोटू कांबळे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देण्यासाठी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने दि. २७ सप्टेंबर रोजी
मुंबई येथे एल्गार महासभेचे आयोजन केले आहे. त्यासाठी उद्घाटक खा. शरद पवार , सभेचे अध्यक्ष पक्षाचे प्रा. सुकुमार कांबळे तर स्वागताध्यक्ष म्हणून पक्षाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष अजिंक्य चांदणे उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या अनुषंगाने विदर्भ नेते संपूर्ण बुलढाणा जिल्हा पिंजून या सभेचे महत्व समाज बांधवांना पटवून दिले तसेच जनजागृती व चर्चासत्र देखील पार पडले. जिल्ह्यातील बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने महासभेला उपस्थित रहावे, असे आवाहन देखील भाई छोटू कांबळे यांनी केले आहे.