

रोहडा ग्रामपंचायत चा असा कसा कारभार? ज्यांची मातीचे घर त्यांना घरकुल नाही अन् ज्यांच्या बिल्डिंग टकाटक त्यांना दिले घरकुल...! गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार..
Mar 17, 2025, 18:18 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील रोहडा ग्रामपंचायत ने प्रधानमंत्री आवास योजनेत गडबड केल्याची तक्रार ग्रामस्थांनी दिली आहे. ज्यांची घरे मातीची आहेत अशांना घरकुल नाही,मात्र ज्यांना बिल्डिंग आहे त्यांना घरकुलाचा लाभ मिळत आहे अशी तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
रोहडा येथील अजय मोतीलाल शेळके, दीपक गजानन कळंगे , राहुल टाकळकर, शेख अनिस आणि शेख युनुस यांनी ही तक्रार गटविकास अधिकाऱ्यांना दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्यांना मातीचे घर आहे त्यांना घरकुल मिळाले नाही आणि ज्यांना बिल्डिंग आहे त्यांना मात्र घरकुलाचा लाभ मिळत आहे. त्यामुळे तातडीने चौकशी करून ग्रामपंचायत कार्यालय आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी असेही तक्रारीत म्हटले आहे. घरकुल वाटपात भेदभाव करणाऱ्यांवर कार्यवाही न केल्यास २४ मार्चपासून चिखली येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे..