अंचरवाडी येथे होणार हिंदुत्वाचा जागर! २५ फेब्रुवारीला विशाल हिंदु संमेलन आणि महाप्रसादाचे आयोजन...! सकल हिंदू समाजाचे आयोजन

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तालुक्यातील अंचरवाडी येथे बुधवार २५ फेब्रुवारी रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित समिती गठित करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक दिपकजी तामशेट्टीवार यांचे प्रमुख उद्बोधन या कार्यक्रमासाठी होणार असून आचार्य स्वामी जगदीशचैतन्य जी महाराज यांचे विशेष आशीर्वचन होणार आहे. याशिवाय महिला वक्त्या म्हणून हभप चेतनाताई गाडेकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे..

 

अनंचरवाडी

 उद्या होणाऱ्या या विशाल हिंदू संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे. अंचरवाडी मंडलातील वसंतनगर, शेळगाव आटोळ, इसरुळ, मंगरूळ, अमोना, कोनड खुर्द, देऊळगाव घुबे, मिसाळवाडी, पिंपळवाडी, काळोना आणि मलगी या गावांतील वारकरी दिंड्या, भजनी मंडळी, गणेशोत्सव मंडळ, दुर्गा उत्सव मंडळ यासह तरुणांची लक्षणीय उपस्थिती या कार्यक्रमात राहणार आहे.
सकाळी ८ वाजता अंचरवाडी गावातून भव्य मिरवणूक आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमानंतर महाप्रसाद होणार आहे. या कार्यक्रमाला सकल हिंदू समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.