"बेवडा है वो ईन्सान"! आ. संजय कुटेंनी दारू पिऊन तिकिटे वाटली? अमरावतीत इच्छुक महिला उमेदवाराचा आरोप! महिलेला झाली आ. संजय गायकवाड यांच्या "त्या"व्हिडिओची आठवण....
अमरावती महानगर भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा श्रद्धा गहलोत अमरावती महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक होत्या. मात्र तिकीट कटल्यानंतर त्या प्रचंड नाराज झाल्या. त्यानंतर त्यांनी निवडणूक प्रभारी आ.संजय कुटेंवर दारू पिऊन तिकिटे वाटल्याचा आरोप केला. "एकदा आ.संजय गायकवाड यांनी आ.कुटेंवर दारू पिऊन शेतात पडून राहत असल्याचा आरोप केला होता, मी तो व्हिडिओ पाहिला, सच मे बेवडा है वो ईन्सान ." अशा माणसाला निवडणूक प्रभारी का बनवले? त्यांनी दारू पिऊन तिकिटे वाटली असेच आता म्हटल्या जाईल. असा आरोप श्रद्धा गहलोत यांनी केला.
एकनिष्ठकार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे, जवळच्याच लोकांना तिकीटे वाटप करण्यात आली..तुमचे नाव सर्वेत आहे असे मला सांगण्यात आले, मात्र ऐनवेळी ज्या नावाची चर्चाच नव्हती..ज्या महिलेने कधी भाजपचे कार्यालय पाहिले नाही अशा महिलेला तिकीट दिल्याचा आरोपही श्रद्धा गहलोत यांनी केला.
