पालकमंत्री मकरंद पाटील आज बुलढाण्यात! बैठकांचा धडाका, विकासकामांचे लोकार्पण अन् उद्या स्वातंत्र्य दिनाचा शासकीय सोहळा..वाचा कसा आहे दौरा...?
आजचा दिवस बैठकांचा अन् विकासकामांचा!
आज सकाळी ११ वाजता अभ्यागतांसाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता गुंतवणूक परिषद बैठकीस पालकमंत्री उपस्थित राहतील.
दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेत सीईओ संग्राम अभियान पुरस्कार सोहळा होणार असून, या कार्यक्रमाला पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर दुपारी २ वाजता सागवण, ता. बुलढाणा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात येणार आहे. दुपारी ३.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवरील आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सायंकाळी ५.३० वाजता मोताळा येथे स्वर्गीय मोबीन अहेमद, माजी जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक सेल यांच्या निवासस्थानी पालकमंत्री सांत्वनपर भेट देणार आहेत.रात्री ८ वाजता बुलढाणा येथील शासकीय विश्रामगृहात मोताळा नगरपरिषदेचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे.
उद्या स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय सोहळा
दरम्यान, उद्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास पालकमंत्री मकरंद पाटील उपस्थित राहणार आहेत.
यानंतर सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या सभेला ते उपस्थित राहतील.
दुपारी १ वाजता मासरुळ येथे विविध विकासकामांचे लोकार्पण आणि कार्यकर्ता मेळावा, दुपारी ३ वाजता सातगाव म्हसला येथे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण, तर सायंकाळी ४ वाजता अमडापूर, ता. चिखली येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व संवाद मेळावा होणार आहे.
यानंतर पालकमंत्री साईनुसार साताऱ्याकडे प्रयाण करणार आहेत.
दरम्यान, आजच्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामे, प्रशासनाशी संबंधित प्रश्न आणि गुंतवणुकीच्या मुद्द्यांवर कोणते निर्णय होतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.