

मेंदू-मणका विकारांवरील मोफत तपासणी शिबिरास उत्तम प्रतिसाद! 300 हून अधिक रुग्णांचा सहभाग; डॉ. निलेश वाघ यांचा स्तुत्य उपक्रम
Apr 11, 2025, 17:32 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – जिल्ह्यातील एकमेव मेंदू, मणका, नस व पॅरॅलिसिस विकार तज्ञ असलेल्या न्यूरॉन हॉस्पिटल व पॅरालिसिस सेंटर, बुलडाणा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. हॉस्पिटलच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक ९ व १० एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास ३०० हून अधिक रुग्णांनी उपस्थित राहून लाभ घेतला.
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे मेंदू व नसा संबंधित विकारांसाठी करण्यात आलेल्या अत्याधुनिक तपासण्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन. डॉ. निलेश अशोक वाघ (न्यूरोलॉजिस्ट) यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात ई.ई.जी., एन.सी.एस., ई.एम.जी. या चाचण्यांवर ५०% सूट देण्यात आली होती. तसेच पॅथोलॉजी लॅब तपासण्यांवर ३०% पर्यंत सूट दिली गेली.
या शिबिरात खालील आजारांवर निदान व सल्ला देण्यात आला:
-
लकवा / अर्धांगवायू / पॅरॅलिसिस
-
झटके / फिट्स, मेंदूतील रक्तस्रावडोकेदुखी / मायग्रेन, तोंड वाकडे होणे
-
मणक्यांचे आजार, हातापायाला मुंग्या येणे
-
चालण्यात अडचण, बोलण्यात अडथळा
-
चक्कर येणे, स्मरणशक्ती कमजोर होणे इ.
डॉ. वाघ यांच्या सामाजिक बांधिलकीचे व तज्ज्ञ सेवांचे जिल्हावासीयांकडून कौतुक होत असून अशा उपक्रमांची गरज अधिक जाणवते आहे.