महापंगत! हिवरा आश्रम येथे स्वामी विवेकानंद जयंती महोत्सवाची सांगता; लाखो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ; १०० ट्रॅक्टर द्वारे महाप्रसादाचे वितरण

 
 हिवरा आश्रम (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हिवरा आश्रम येथे आज स्वामी विवेकानंद जन्मोत्सव महोत्सवाची सांगता महापंगतीने झाली. यावेळी तब्बल दोन लाखावर भाविकांनी एकाच वेळी महाप्रसादाचा लाभ घेतला..
  स्वामी विवेकानंद यांचा १६२ वा जयंती महोत्सव विवेकानंद आश्रम येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. आज,२१ जानेवारीला महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ३०० क्विंटल पुरी आणि वांग्याची भाजी असा महाप्रसाद वितरित करण्यात आला. ५० एकरावरील जमिनीवर भव्य महापंगत पार पडली, तब्बल १०० ट्रॅक्टर आणि स्वयंसेवकांच्या मदतीने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे वितरण झाले...