ग्रंथदान श्रेष्ठदान...जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांचे प्रतिपादन! जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पुस्तक प्रदर्शन, ‘विक्री’ आणि ‘ग्रंथदान’ उपक्रम...
Jan 29, 2025, 08:50 IST
बुलढाणा(जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मराठी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीने प्रचार व प्रसार होण्यासाठी राज्यभरात मराठी भाषा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘पुस्तक प्रदर्शन व विक्री’चे आयोजन करण्यात आले होते. यासह 'ग्रंथदान' हा उपक्रम देखील राबविण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रदर्शनीला भेट देऊन ग्रंथदान करण्याचे आवाहन केले.
हा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन भूसंपादन इमारतीमध्ये सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पुस्तक प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला पुस्तकप्रेमी, वाचनप्रेमीं यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच ‘ग्रंथदान’ उपक्रमातमध्ये अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सहभागी घेऊन 100 हून अधिक पुस्तक दान केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिलहाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड उपस्थित होते.