पूर्णवेळ कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या; मानधन थेट खात्यात जमा करा; ग्राम राेजगार सहाय्यक संघटनेचे खामगावात कामबंद व धरणे आंदाेलन...
Oct 3, 2025, 18:03 IST
खामगाव(भागवत राऊत :बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :पूर्णवेळ कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या यासह विविध मागण्यांसाठी ग्राम राेजगार सहाय्यक संघटनेच्यावतीने खामगावात ३ ऑक्टाेबर राेजी एक दिवशीय कामबंद व धरणे आंदाेलन करण्यात आले.
३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता पासून खामगाव पंचायत समिती समोर ग्राम रोजगार सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्य (खामगाव तालुका) यांच्यामार्फत एक दिवसीय काम बंद व धरणे आंदोलन करण्यात आले.यामध्ये ३ ऑक्टोबर २०२४ चा जीआर लागू करण्यात यावा, रोजगार सहाय्यक यांचे मानधन थेट खात्यात जमा करण्यात यावे, रोजगार सहाय्यक यांना पन्नास रुपये विमा कवच देण्यात यावे तसेच रोजगार सहाय्यक यांना पूर्णवेळ कर्मचारी दर्जा देण्यात यावा या मागण्यांसाठी हे आंदाेलन करण्यात आले. या आंदोलनाला विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी आपला पाठिंबा दिला आहे.