बुलढाणा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवारी शिवराज्यभिषेक दिनाचे आयोजन ! व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांचे व्याख्यान...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): श्री. पलसिद्ध महास्वामी शासकीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलढाणा येथे शुक्रवार दि. ६ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता शिवराज्यभिषेक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजक नाविन्यता विभाग व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री ना. मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून शिवराज्यभिषेक साजरा करण्यात येणार आहे. शिवराज्यभिषेक दिनाचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभ हस्ते होणार आहे. व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार कृष्णा सपकाळ यांचे या कार्यक्रमात प्रमुख व्याख्यान होणार आहे. शिवराज्यभिषेक दिनाच्या विशेष महत्वासह विद्यार्थ्यामध्ये नागरी कर्तव्य, स्वदेशी विचारांचा प्रसार, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण या बाबत ते मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहे. तरी या कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. पलसिद्ध महास्वामी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.