गौरवास्पद! दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय मिक्स बॉक्सिंग स्पर्धेसाठी जिल्ह्याचे सुपुत्र गणेश पेरे पंच म्हणून काम पाहणार...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यासाठी गौरवास्पद बातमी आहे. दिल्ली येथे ५ ते ७ जानेवारी दरम्यान राष्ट्रीय मिक्स बॉक्सिंग स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्याचे सुपुत्र मिक्स बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव गणेश पेरे यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. 
गणेश पेरे यांनी याआधी महाराष्ट्र संघाचे ३ वेळा प्रशिक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. विशेष म्हणजे गणेश पेरे प्रशिक्षक असताना तीनही वेळेस महाराष्ट्र संघाने पदक मिळवले आहे. गणेश पेरे यांच्या या कामगिरीची दखल आता राष्ट्रीय पातळीवर देखील घेण्यात आली असून दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत गणेश पेरे यांची भूमिका निर्णायक राहणार आहे. गणेश पेरे यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.