देऊळगाव घुबेचे सुपुत्र गणेश पेरे यांचा नेपाळमध्ये विशेष सन्मान! स्पेशल आहे कारण....
Updated: Jun 3, 2025, 14:32 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नेपाळ येथे ३०-३१ मे २०२५ रोजी पार पडलेल्या वर्ल्ड एशियन मिंक्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव घुबेचे सुपुत्र गणेश प्रल्हादजी पेरे यांनी ऑफिशियल म्हणून यशस्वी कामगिरी बजावली. त्यांच्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेत नेपाळ सरकार, एशियन मिंक्स बॉक्सिंग असोसिएशन तसेच वर्ल्ड मिंक्स बॉक्सिंगतर्फे त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या स्पर्धेत भारतासह नेपाळ, श्रीलंका, जर्मनी, भूतान, चीन अशा ६ देशांनी सहभाग घेतला होता. एकूण १२ रेफ्री आणि ९ ऑफिशियल्समध्ये भारतातून गणेश पेरे यांची निवड झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही गौरवाची बाब ठरली आहे. त्यांनी आपल्या जबाबदारीचे उत्कृष्ट पालन करत भारताचा झेंडा उंचावला.
गणेश पेरे सध्या भारतीय शांति खेल महासंघ महाराष्ट्र आणि मिंक्स बॉक्सिंग असोसिएशन बुलढाणाचे सचिव आहेत. ग्रामीण भागातून येऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी मिळवलेला हा सन्मान संपूर्ण देऊळगाव घुबे गावासाठी अभिमानास्पद ठरला आहे.
या गौरवाच्या प्रसंगी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी खालील मान्यवर आणि संस्था पुढे आल्या:
प्रशांत मोहीते सर (अध्यक्ष, मिंक्स बॉक्सिंग महासंघ), जयवंत दादा (सल्लागार), बी.एस. महानकर सर (जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलढाणा), मोहम्मद सोफियान सर (NIS प्रशिक्षक, बॉक्सिंग), दिलीप लांडकर सर (क्रीडा संयोजक, चिखली), देवानंद नेमाने सर, असलम हिंदीवाले (बॉक्सिंग प्रशिक्षक), कैलास करवंदे सर (खो-खो जिल्हा सचिव), संजय सावंत सर, एल.एस. घुबे सर (उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त), राम काछवाल सर (बॅडमिंटन प्रशिक्षक), कार्तिक पोटे (आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू), योगीराज स्पोर्ट्स & मेन्स वेअरचे वैभव व शुभम सोळंकी (युवा उद्योजक), विष्णू पाटील घुबे (तालुका उपाध्यक्ष, भाजप), स्वामी विवेकानंद क्रीडा मंडळ, देऊळगावचा राजा विघ्नहर्ता श्री गणेश मंडळ आणि ग्रामस्थ मंडळी. गणेश पेरे यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.