गुड फ्रायडेच्या सुटीमुळे शुक्रवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बि.एस. भुसारी यांची माहिती

 
 बुलढाणा, (जिमाका: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):बुलढाणा जिल्हा रुग्णालयात दर शुक्रवारी नियमितपणे नेत्र, मतिमंद, कान, नाक व घसा यासंबंधित दिव्यांग तपासणी शिबीर आयोजित केले जाते. मात्र, उद्या,शुक्रवार दि.१८ एप्रिल रोजी गुड फ्रायडे निमित्त शासकीय सुट्टी असल्याने हे शिबीर रद्द करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी या दिवशी तपासणीसाठी रुग्णालयात येऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बि.एस. भुसारी यांनी केले आहे. पुढील शुक्रवारी हे शिबीर नियमित वेळेनुसार घेण्यात येईल.