२५ वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांना माेबादलाच नाही; आता जलसमाधीचा दिला इशारा; उतावळी प्रकल्पग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेतच प्रशासनाला दिले निवेदन..!

 
 बुललढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :जिगाव प्रकल्पग्रस्तांच्या जलसमाधी आंदाेलनानंतर आता उतावळी प्रकल्पग्रस्तही माेबदल्यासाठी आक्रमक झाले आहेत. २५ वर्षांपासून देउळगाव साकर्शा येथील प्रकल्पग्रस्तांना माेबादला मिळालेला नाही. त्यामुळे, येत्या दाेन सप्टेंबरपूर्वी माेबदला न दिल्यास उतावळी प्रकल्पात कुटुंबियांसह जलसमाधी आंदाेलन करण्याचा इशारा आहे. 
मेहकर तालुक्यातील देउळगाव साकर्शा येथील उतावळी प्रकल्पाला १९९८ साली मंजुरी मिळाली आणि २००४ साली प्रकल्प पूर्ण झाला. मात्र आजपर्यंत मोबदला किंवा वाढीव मोबदल्याच्या मागणीवर कार्यवाही न झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. २५ वर्षांपासून शेतकऱ्यांना माेबदला मिळाला नसल्याने आता २ सप्टेंबर राेजी थेट कुटुुंबियांसह प्रकल्पातच जलसमाधी आंदाेलन करण्याचा इशारा दिला आहे. याविषयी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.