पुराच्या पाण्याचा कहर! नाल्याजवळ संडासला गेला,२६ वर्षीय तरुण वाहून गेला... लोणार तालुक्यातील घटना

 
 बीबी(श्रीकृष्ण पंधे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर लोणार तालुक्यात काल सायंकाळ पासून संततधार पाऊस सुरू आहे. लोणार तालुक्यातील महार चिकना फाट्याजवळ एक २६ वर्षीय तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला...आज,सायंकाळी तरुणाचा मृतदेह सापडला आहे. तरुण लोणार तालुक्यातील दादुलगव्हाण येथील राहणारा असून रोहिदास श्रावण शिरसाट असे तरुणाचे नाव आहे.

रोहिदास महार चिकना फाट्यावरील पवन वाईन बार येथे कामाला होता. बारच्या बाजूस लागून असलेल्या नाल्याजवळ सकाळी दहा वाजता तो संडासला गेला होता. मात्र पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. बार मालक व गावकऱ्यांनी इतरत्र शोधाशोध घेतली असता तो मिळून आला नाही. या प्रकरणाची माहिती बीबी पोलिसांना देण्यात आली. गावकरी व महसूल पथकाच्या कर्मचाऱ्यांनी शोधाशोध घेतली असता आज सायंकाळी सहा वाजता बार लगत असलेल्या नाल्याच्या बाजूला पुलामध्ये त्याचा मृतदेह सापडला आहे..