

फायरब्रँड नेते,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे २७ मार्चला येणार जिल्ह्यात! कारण काय? वाचा...
Mar 25, 2025, 20:21 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): उबाठा शिवसेनेचे फायर ब्रँड नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे २७ मार्चला बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
गुरुवारी २७ मार्चला ना .अंबादास दानवे जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी ९ वाजता देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथे ते जाणार आहेत. शहिद शेतकरी कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट ते घेणार आहेत. त्यानंतर ना.अंबादास दानवे देऊळगावराजा– जाफ्राबाद–सिल्लोड–भराडी मार्गे पिशोरकडे प्रयाण करतील.