फायटिंग...आमदार संजय गायकवाडांनी आमदार निवास कॅन्टिंगच्या कर्मचाऱ्याला चोपले; शिळे अन्न दिल्यावरून संताप!
Jul 9, 2025, 07:53 IST
मुंबई(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): सध्या वेगवेगळ्या विधानांनी चर्चेत असलेले आ.संजय गायकवाड आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. पावसाळी अधिवेशनामुळे सध्या मुंबई मुक्कामी असलेल्या आ.गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टिंगच्या कर्मचाऱ्याला बेदम चोप दिला. त्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय.. शिळे अन्न दिल्यावरून आ.गायकवाड यांचा संताप अनावर झाला.
"तू आमदारांनां असं खायला देतोय, सामान्य लोकांना काय देत असशील?" असं आमदार गायकवाड त्या कर्मच्यालाला म्हणत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. आज आ. गायकवाड शिळ्या अन्नावरून सभागृहात मुद्दा उपस्थित करणार आहेत.
